राजन तेलींचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करणार..

39
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले भाजपचा निर्णय; दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द…

वेंगुर्ले,ता.२४: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रम राबवून सेवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय वेंगुर्ले भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वेंगुर्ले शहरात मंदिरासमोर फुल विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना छत्रीवाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे तसेच मुसळधार पावसामुळे सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिली.