आंबोली घाटात अज्ञातांनी लुटल्याचा रत्नागिरीतील युवकांचा बनाव…

15
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसांकडून पोलखोल; कर्ज फेडण्यासाठी प्रकार केल्याची कबुली…

सावंतवाडी,ता.२६: कर्जाचे पैसे फेडण्यासाठी रत्नागिरी येथील दोघा युवकांनी आंबोली घाटात आपल्याला अज्ञातांनी लुटले असा बनाव केला. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांची पोलखोल झाली.
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
या प्रकरणी त्या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मयुरेश तलवार व ओमकार किर असे त्या युवकांची नावे आहेत. ते काल रत्नागिरी येथून आपल्या ताब्यातील टेम्पोतून मासे घेऊन बेळगाव येथे गेले होते. आज परतत असताना त्यांनी शक्कल लढवत तब्बल लाखो रुपये परस्पर हडप करण्याचा प्रकार केला. या एकूणच प्रकारानंतर पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. मात्र पोलीस चौकशीत त्या दोघांकडून मिळालेली उत्तरे वेगवेगळी असल्याने त्या दोघांवर संशय आल्याने त्यांचा हा बनाव उघड झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की,ओमकार याने दोन वर्षांपूर्वी छोटा टेम्पो हप्त्यावर घेतला होता. त्याचे कर्ज थकीत होते दरम्यान त्याला काल रत्नागिरी येथील एका मासे व्यावसायिकाचे भाडे मिळाले होते. सदर टेम्पोतून मासे घेऊन तो बेळगाव येथे गेला होता. यावेळी त्याने आपल्या सोबत मयुरेश याला घेऔले होते. या माशांची रक्कम संबंधित बेळगाव येथील व्यक्तीने ओमकार व मयुरेश यांच्याजवळ देऊन ती मासे व्यवसायिकांजवळ देण्यास सांगितली होती. सदरची रक्कम घेऊन ते आज बेळगाव येथून सकाळी निघाले होते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते आंबोली घाटात आले असता त्यांनी सदरची रक्कम हडप करण्याचा प्लॅन केला आणि ते आंबोलीतून खाली बावळट येथे आले तेथील पोलिसांना त्यांनी आपल्याला दोन अज्ञात व्यक्तींकडून चाकूचा धाक दाखवण्यात आला व आपल्याकडील लाखो रुपयांची रक्कम मोबाईल लुटल्याचे सांगून आपल्याला पोलिसात तक्रार करायची सांगितली तेथील पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या असे सांगितल्यानंतर ते टेम्पो सहित पोलीस ठाण्यात पोचले तेथे बनाव केलेली हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब तपासाची यंत्रणे हाती घेत दोघांसहीत पुन्हा आंबोली गाठली.

त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली एकूणच त्या दोघांबाबत पोलिसांचा संशय बळावला त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता त्या दोघांनी हा बनाव केल्याचे उघड झाले तशी कबुली ही त्यांनी काही वेळाने देत टेम्पोमध्ये लपवून ठेवलेली रक्कमही पोलिसांकडे सुपूर्त केल्याचे पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले. आपल्याला टेम्पोचा हप्ता आहे दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या टेम्पोचे तब्बल १२ लाख रुपये भरायचे आहेत त्यामुळे आपण हा प्रकार केल्याचे ओमकार यांनी सांगितले. शिवाय गाडीला भाडे नसल्याने हप्ते चुकले आहेत ही रक्कम घेऊन आपण गाडीचे हप्ते फेडणार होतो असे त्यांनी सांगितले. एकूणच या प्रकाराबाबत पोलिसही चक्रावून गेले दरम्यान या घटनेबाबत त्यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात पदकपत्रक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.