बुधवळेतील दुचाकी चोरी प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता…

14
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २८ : बुधवळे मळेशेतवाडी येथील दुचाकी चोरी प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेल्या गुरुदास अनंत मेस्त्री रा. खुडी शिंदेवाडी ता. देवगड याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले.
बुधवळे मळेशेतवाडी येथील विजय खरात यांची घरालगतच्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी एम. एच. ०७ एडी-८९३६ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना २४ ते २५ जुलै या कालावधीत घडली. याबाबतची तक्रार श्री. खरात यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात या दुचाकी चोरी प्रकरणी खुडी शिंदेवाडी- देवगड येथील गुरुदास मेस्त्री याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हहर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.