होडावडा येथे २९ जुलैला श्री तालविश्र्व संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा…

26
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२८: येथील तालविश्व संगीत विद्यालय संचलित गुरुवर्य अनंत तांबोसकर यांच्या श्री. तालविश्व संगीत विद्यालयाचा “गुरु अभिवादन सोहळा” २९ जुलै सकाळी ९.०० वाजता मराठे मंगल कार्यालय होडावडा-सुभाषवाडी वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यामध्ये सकाळच्या सत्राची सुरुवात पुण्यातील सुप्रसिद्ध गायक तेजस मेस्त्री यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पखवाज वादन कार्यक्रम संपन्न होईल. तसेच कार्यक्रमाची सांगता पुणे येथील गायक तेजस मेस्त्री, गोवा येथील गायक सत्यनारायण कळंगुटकर व वेंगुर्ला येथील गायक पुरुषोत्तम परब तसेच जिल्ह्यातील नामवंत गायकांचा संगीत स्वरसंध्या कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व संगीत प्रेमी व रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विद्यालयाच्या विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आले आहे.