जिल्हा परिषद भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या…

14
2
Google search engine
Google search engine

अनिल केसरकर; अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा…

सावंतवाडी,ता.०५: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत गट-क वर्गातील सरळसेवेची पदे भरण्याकरीता शासनाकडून ऑनलाईन पद्दतीने अर्ज मागविण्यात आले असून हि भरती प्रक्रिया पूर्ण पणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी व या भरती प्रक्रियेमध्ये फक्त स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे, अन्यथा या भरती प्रकियेविरुध्द न्यायालयीन लढा उभारावा लागेल, असा इशारा मनसेच्या विधी आणी जनहित कक्षाचे जिल्हा संघटक व माजी उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
तसेच या ऑनलाईन भरती साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी देखील आपले अर्ज जास्तीत-जास्त संख्येने दाखल करावेत. अन्यथा याचा फायदा घाटमाथ्यावरील उमेदवार घेतील त्या मुळे या संधीचा फायदा स्थानिक तरुणांनी करून घ्यावा, असे आवाहन देखील अँड. अनिल केसरकर यांनी केले आहे