नांदगाव येथे होणार भव्य मार्केट यार्ड उभारण्यात यावे…

15
2
Google search engine
Google search engine

नितेश राणेंची मागणी ; पणनमंत्री अब्दूल सत्तार यांना दिले निवेदन…

कणकवली,ता.५: तालुक्‍यातील नांदगाव येथे मार्केट यार्डची उभारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी पणनमंत्री अब्‍दूल सत्तार यांना दिले. तर श्री. सत्तार यांनी मार्केट यार्ड उभारणीबाबत पणन विभागाच्या उपसचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असल्‍याची माहिती आमदार श्री.राणे यांनी दिली.

श्री. राणे यांनी निवेदनात म्‍हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, खैर लाकूड, इमारती लाकूड यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. वरील उत्पादीत माल हा थेट मुंबई बाजारपेठेत जातो. त्यानंतर राज्याच्या इतर भागात तसेच परदेशात पाठविला जातो. यासाठी जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्डची निर्मिती झाल्यास, त्याठिकाणी लिलावगृह, शेतकरी निवास, बाजार, शीतगृह, भुईकोट गोदामे, हमाल भवन, बैलबाजार यांची सुविधा स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. त्‍यायोगे जिल्ह्यातील व्यापार उदीम वाढून आपल्या उत्पादनांला चांगला बाजारभाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव येथील रेल्वे स्टेशन जवळ मार्केट यार्डची उभारणी झाल्यास सर्वांना सोईचे होईल. तरी मंजूरीच्या कार्यवाहीबाबत त्वरीत आदेश व्हावेत.