देवलीतील युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

21
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०८ : तालुक्यातील खालची देवली (भीमनगर) येथील रमेश सदाशिव सोनवडेकर (वय-३८) या युवकाचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या अकाली निधनामुळे देवली गावावर शोककळा पसरली आहे.
तारकर्ली येथे गणेश चित्र शाळेत रमेश हा त्याच्या भावासमवेत मूर्तीकाम करत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. रमेश हा उत्तम पेंटर होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.