आयुर्वेद महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा…

7
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी संघाकडून “फ्लेक्सस” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी रमेश पई यांनी संस्थेला ४८ हजार तर डॉ. डी.बी. खानोलकर चॅरिटेबल ट्रस्ट, बांदा यांच्याकडून २ लाखाची देणगी देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत, संस्थेचे जेष्ठ सहसचिव रमेश पई, सहसचिव गणेश बोर्डेकर, संचालक अमोल सावंत, गुरुदास मठकर, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. निलेश कोदे, डॉ. बळीराम जाधव, डॉ. शिवराम पई, डाॅ. अजित पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष नार्वेकर यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कठाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नार्वेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, रमेश पई यांचे संस्थेच्या जडण घडणीमध्ये तसेच या महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये फार मोठे योगदान लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच या संस्थेने आजपर्यंत प्रगती केली आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विकास सावंत, सहसचिव गणेश बोर्डेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कठाणे यांनी रमेश पई यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी या महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा खडतर प्रवास कथन केला. त्यातून मार्ग काढीत या महाविद्यालयाचने प्रगती केली तसेच भविष्यात हे महाविद्यालय पुढील विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, अशी शुभेच्छा व्यक्त केली.

यावेळी उपप्राचार्य डॉ, संजय दळवी, माजी प्राचार्य डॉ. दीपक तुपकर, डॉ. डी.बी.पाटील, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. साईनाथ सीतावर, डॉ. प्रवीण देवऋषी, डॉ. नंददीप चोडणकर, डॉ. ललित विटलानी, डॉ. शीतल पाटील, डॉ. राजेंद्र पाटील व अध्यापक अध्यापेकर अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.