फिट येऊन समुद्रात कोसळल्याने देवगडात खलाशाचा मृत्यू…

14
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.०८: फिट येऊन समुद्राच्या पाण्यात कोसळल्यामुळे देवगड येथे कर्नाटक येथील खलाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल बंदर परिसरात घडली होती. आज त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. दुर्गाप्पा लक्षाप्पा कोरवार असे त्याचे नाव आहे. तो मालवण येथील प्रकाश शेट्टीगार यांच्या नौकेवर कामाला होता. याबाबतची तक्रार त्याचा भाऊ गौडप्पा कोरवार यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक तपास हवालदार राजन जाधव व आशिष कदम करीत आहेत.