विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी शिकाऱ्याला अटक…

12
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई; अणसुरपाल येथे ताब्यात, काडतूसे जप्त…

वेंगुर्ले,ता.०९: शिकारीच्या उद्देशाने विना परवाना काडतूसाची बंदूक घेऊन जात असताना वेंगुर्ले येथे एकाला काडतूसांसह ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश भिकाजी गावडे (रा अणसुरपाल) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी ८ वाजता अणसुरपाल-वादळवाडी येथे त्याच्याच घराच्या मागे असलेल्या जंगलात वेंगुर्ले पोलिसांकडून करण्यात आली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ला पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार काल रात्री अणसुरपाल भागात सापळा रचला होता. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मंगेश गावडे बंदूक घेऊन शिकारीला जाताना आढळून आला. याच्याकडून अनधिकृत बंदुक व त्यातील जिवंत काडतूस जप्त केलेले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, चौहाण, विठठल धुरी, अमर कांडर, पांडुरंग खड़पकर, सुरेश पाटील यांनी केलेली आहे. पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान पोलीस पांडुरंग खडपकर यांच्या फिर्यादी वरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनिमय कलम ३, २५ हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा तपास रंजीता चौहान या करीत आहेत.