सिंधुदुर्गचा शैक्षणिक वारसा कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करा..

16
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पाठीशी राहण्याचे अभिवचन…

सावंतवाडी,ता.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्याला शैक्षणिक वारसा आहे. तो कायम टिकवण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या मी कायम पाठीशी आहे. त्यांना आवश्यक असलेले सहकार्य केले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि दीपक केसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून येथील काझी बुद्दीन सभागृहात आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची ऑनलाइन संवाद साधला.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सुभाष चौगुले, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हा महिला संघटक निता कविटकर, दादा मडकईकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.