भुईबावडा येथील प्राथमिक प्रशालेत ‘क्रांतीदिन’ साजरा…

12
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०९: क्रांती दिनाचे औचित्य साधून गांगेश्वर विद्या मंदिर भुईबावडा प्रशालेला मयूर क्रीडा मंडळ आंबेवाडी यांच्यावतीने थोर नेत्यांचे फोटो फ्रेम भेट देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी श्री. वडर, शालेय व्यवस्थापन समिती, मयूर क्रीडा मंडळ आंबेवाडी भुईबावडा सहकारी राजेंद्र मोरे, अनंत मोरे, प्रशांत मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंभार आदी शिक्षक वृंद, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे परमार्थाचे परमोच्च साधन म्हणजे दान यानुसारच आपले मंडळ समाजभान जाणून उत्तुंग असे कार्य करीत आहे. आपल्या मंडळाद्वारे आपल्या शाळेत भारतीय स्वातंत्र्य साठी तन-मन-धन अर्पण केलेल्या स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक, थोर समाज सुधारक, महात्मे यांचे फोटो फ्रेम प्रशालेला भेट म्हणून देण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, भारतीय परंपरा समजण्यास नक्कीच उपयुक्त ठरणारे आहेत. आपली शाळेविषयीची ही कृतज्ञता भेट शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीसाठीची मोठी संधीच म्हणावी लागेल. त्याबद्दल गांगेश्वर विद्या मंदिर भुईबावडा मधील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी आपल्या मंडळाचे सदैव ऋणी आहेत आपल्या मंडळाची उज्वल वाटचाल उतरोतर अशीच बहरत राहो अशी आशा मःडळाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.