जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक…

10
2
Google search engine
Google search engine

बाईक रॅली काढून निदर्शने; शासनाच्या कर्मचारी धोरणाचा निषेध…

सिंधुदुर्गनगरी,ता.०९: जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. तसेच बेमुदत संप कालावधीत शासनाने दिलेल्या आस्वासनाची पूर्तता व्हावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आज क्रांतिदिनी बाईक रॅली काढून निदर्शने केली.

देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने होत असताना जिल्ह्यामध्ये देखील शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेमार्फत बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बाईक रॅली ला कर्मचाऱ्यांकडून आवश्यक असा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. त्यामुळे काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीला कर्मचाऱ्यांचा आवश्यक प्रतिसाद मिळाला नसल्याने या रॅली ची सांगता लगेच झाली.

त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत पी. एफ. आर. डी. ए. कायदा रद्द व्हावा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, कामगार विरोधी सर्व कायदे रद्द करावेत, सर्व आस्थापनांमध्ये कंत्राटीकरण रद्द करावे तसेच तेथे नियमित भरती करावी त्याचप्रमाणे किमान वेतन हे २८ हजार रुपये करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. व आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मश्चिन्द्र सुखटे यांच्याकडे सादर केले.