आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड…

15
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.११: येथील आरती पवार यांची सरकारी अभियोक्ता पदी निवड करण्यात आली आहे. सध्या त्या सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक अभिरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एलएल.बी चे शिक्षण कराड येथील लॉ कॉलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग मधील इतर तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात तसेच गोवा येथील न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रॅक्टिस केली.सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी अँड.आरती पवार यांनी अहोरात्र मेहनत घेतली व त्यामुळे त्या पहिल्या प्रयत्नात यश संपादन करण्यात यशस्वी झाल्या.

संबंधित यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले.हे यश संपादन करण्यास अँड. श्रीनिवास गवस व अँड. वैभव चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.