निसर्ग प्रेमींना “एक दिवसीय जंगल भटकंतीची” संधी….

45
2
Google search engine
Google search engine

वनविभागाचा उपक्रम; नरेंद्र डोंगर परिसरात जैवविविधता पाहता येणार….

सावंतवाडी,ता.१४: येथील वनविभागाच्या माध्यमातून जैवविविधतेचा अभ्यास निसर्गप्रेमींसाठी “एक दिवसीय जंगल भटकंती” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १६ ऑगस्टला येथील नरेंद्र डोंगर परिसरात सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थी तसेच निसर्गप्रेमींना जैवविविधतेचे दर्शन घडविले जाणार आहे.
त्याच बरोबर वनस्पती, कीटक, कोळी, साप, सरडे आदींची माहिती देण्यात येणार आहे. तसेच चर्चेनंतर प्रश्न मंजूषा आणि त्यानंतर पारितोषिक वितरण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त निसर्गप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांनी केले आहे.