निरवडे भूतनाथ देवस्थानच्या अध्यक्षपदी नागेश गावडे…

28
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१७: निरवडे येथील श्री देव भूतनाथ पंचायतन देवस्थानच्या उपसमिती अध्यक्षपदी नागेश गावडे, सचिव पदी प्रणव नाडकर्णी तर खजिनदार म्हणून विनय गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

तर सदस्य पदी भगवान गावडे, शंकर गावडे, दिनकर गावडे, लवू गावडे, शांताराम उर्फ निखिल माळकर, शिवराम मेस्त्री,महादेव पवार, बाबुराव जाधव, श्रीकृष्ण बांदिवडेकर, मुकुंद बाईत शामसुंदर बर्डे, प्रकाश भाईडकर आदींची निवड करण्यात आली आहे.
या ग्रामसभेमध्ये पश्चिम देवस्थान समिती कोल्हापूर कार्यालय प्रमुख शितल इंगवले, सावंतवाडी उपस समिती लिपिक बाळकृष्ण ननवरे, सावंतवाडी उपविभाग लिपिक सचिन बांदेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम, प्रभारी पोलीस पाटील रोशनी जाधव, तलाठी नमिता कुडतरकर, माजी सरपंच प्रमोद गावडे, चंद्रकांत गावडे, मधुसुदन गावडे, बाबुराव गावडे, हरी वारंग, दशरथ मल्हार, धर्माजी गावडे, संजू गावडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने निरवडे ग्रामपंचायतिला उपसमिती नियुक्ती बाबतचे आवाहन करण्यात आले होते. समितीच्या व्यवस्थापनाखाली मंदिराची वार्षिक यात्रा जिर्णोद्धार दैनंदिन व्यवस्थापन आदी गोष्टींसाठी उपसमिती कार्यरत असणे आवश्यक असते त्यानुसार जिल्हाधिकारी तथा समितीच्या प्रशासकांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावातील उपसमत्यांची मुदत संपली आहे त्या गावांनी गुरुवारी होणाऱ्या ग्रामसभेत नियमावलीनुसार उपसमिती नेमावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज ग्राम सभेत श्री देव भूतनाथ पंचायतन देवस्थान उप समितीची निवड करण्यात आली आहे. या ग्रामसभेला ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या झालेल्या नूतन कार्यकारणीचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले व अध्यक्ष नागेश गावडे यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.