गाईंची वाहतूक केल्याप्रकरणी पिंगुळीतील दोघे ताब्यात…

23
2
Google search engine
Google search engine

एलसीबीची कारवाई; कत्तलीसाठी आजरा येथे नेत असल्याची कबुली…

सावंतवाडी,ता.१७: गाईंची कत्तलीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारिवडे येथे दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ गायी व ४ लाखाचा बोलेरो पिकअप, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासीर आजम शेख (वय ३१) व आजीम रेहमान शेख (वय ५७) दोघे (रा. पिंगुळी गोंधळपूर-मुस्लिमवाडी ता. कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गाईंची सुटका करून त्या गाई गो शाळेत जमा करण्यात आल्या आहेत.

याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारिवडे येथे सापळा रचला. यावेळी हे दोघे आपल्या बोलेरो पिकअप मधून गाई घेऊन येताना दिसले. यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीत ५ गाई असल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. चौकशी दरम्यान त्या गाई आपण आजरा येथे कत्तल करण्यासाठी नेत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.