भाजपाच्या माध्यमातून कुडाळात ५ लाख ५५ हजाराची दहीहंडी…

14
2
Google search engine
Google search engine

निलेश राणेंची माहिती; मुंबई-गोवा महामार्गाची १ लेन चतुर्थीपुर्वी सुरू होणार…

कुडाळ,ता.१७: भाजपाच्या माध्यमातून कुडाळ येथे यावर्षी ५ लाख ५५ हजार ५०० रुपयाची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. यावेळी प्राजक्ता माळी, मानसी नाईक, भाऊ कदम, देवदत्त नागे तसेच गायक आणि अन्य कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे दिली. दरम्यान गणपती पुर्वी मुंबई-गोवा महामार्गाची १ लेन सुरू करण्यात येणार आहे. तसे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे तर दुसरीकडे कोकणात चतुर्थीत ३ हजार बसेस सोडणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले.

सिंधुदुर्ग राजाची मंडप उभारणी आणि गावराई, पडवे, वेताळ-बांबर्डे येथील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, युवा नेते विशाल परब, संध्या तेरसे, प्राजक्ता शिरवलकर, निलेश परब, राकेश कांदे, विलास कुडाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी गावराई सरपंच सोनाली तिरोडकर, स्वप्निल वेंगुर्लेकर, सुरेश कदम, विजयालक्ष्मी परब, संगीता नलावडे, धनेश तिरोडकर, प्रतिभा गावडे, रोशन सांडव, विशाल सांडव आदींनी भाजपात प्रवेश केला.