रेल्वे तिकीटाचा काळाबाजार सावंतवाडीतील एक ताब्यात…

5
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.१७: रेल्वे तिकीटाचा काळाबाजार केल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सावंतवाडी येथे टाकलेल्या छाप्यात एका युवकाला ताब्यात घेतले अक्षय देशपांडे वय ३० असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

यातील देशपांडे हा सावंतवाडी येथील आपल्या केद्रांत तिकीटाचा काळा बाजार करीत असल्याची माहीती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल छापा टाकला होता. त्यानंतर त्याला अटक करुन कणकवली येथे नेण्यात आले होते. उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तर या प्रकरणी संबधितांचा बुकींग आयडी ब्लॉक करण्यात आला असून अन्य साहीत्य जप्त करण्यात आले आहे. अशी माहीती रेल्वे पोलिसांकडुन देण्यात आली.