उद्योग मंत्र्यांना हात जोडून विनंती आता तरी आडाळी एम.आय.डी.सी चा प्रश्न सोडवा…

8
2
Google search engine
Google search engine

राजन तेली; सत्तेत असलो तरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार…

सावंतवाडी,ता.१८: स्थानिक नेतृत्वाने पत्र देवून “खो” घातल्यामुळे आडाळी येथे होणार्‍या एम.आय.डी.सी तील प्लॉट देण्याची प्रकीया रखडली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी आता यात पुढाकार घ्यावा असे आवाहन आज येथे आायोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. दरम्यान तब्बल दहा वर्षे सुटलेला प्रश्न सोडविणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सत्तेत असलो तरी २० तारखेला होणार्‍या लॉग मार्च मध्ये सहभागी होणार आहोत असे त्यांनी सांगितले.

श्री. तेली यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष रविद्र मडगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रमोद गावडे, बंटी पुरोहीत, अमित परब, संदेश टेमकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. तेली यांनी मंत्री दिपक केसरकर यांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले या ठीकाणी आडाळी एम.आय.डी.सी मंजूर होवून तब्बल दहा वर्षाचा कालखंड लोटला आहे. परंतू अद्याप पर्यंत त्या ठीकाणी प्लॉट लोकांना मिळाले नाही.

स्थानिक नेतृत्वाने मोठा उद्योजक आणणार असे पत्र देवून ठेवल्यामुळे या ठीकाणी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली मात्र ती बैठक पाच मिनीटात आटोपती घेण्यात आली. त्यामुळे या मागे काही तरी काळेबेरे आहे. हे लक्षात येते त्यामुळे आता काही झाले तरी हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सत्तेत असलो तरी शासनाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या लाँग मार्च आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत असे त्यांनी सांगितले.