जाळी पंख्यात अडकल्याने आचरा समुद्रात पात बुडाली…

5
2
Google search engine
Google search engine

सुदैवाने तिघे मच्छीमार बचावले; उधाण आल्याने पहाटे घडली घटना…

आचरा,ता.१९: समुद्रात आलेल्या उधाणामुळे जाळी होडीच्या पंख्याला अडकल्यामुळे आचरा समुद्रात पुजा नामक पात बुडाली. यावेळी आत असलेले तिघे मच्छीमार बाहेर फेकले गेले. मात्र ते सुदैवाने बचावले. यात पातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा समुद्रात घडली.

आचरा पिरावाडी येथील मच्छिमार विदेश नारायण कुमठेकर,आदित्य बापू धुरी, वैभव कुमठेकर हे आपली पूजा पात घेऊन मच्छिमारी साठी गेले होते. मुणगे तालुका देवगड बाजूने मासेमारी करत असताना अकस्मात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मासेमारी साठी समुद्रात टाकलेली जाळी होडीच्या इंजिनच्या पंख्याला अडकून इंजिन बंद पडल्याने होडी मुणगे आडबंदर मोबार धाकटे केवूंडले येथील खडकाळ भागात दगडांवर आपटल्याने झालेल्या दुर्घटनेत होडीतील तिघेही बाहेर फेकले गेले. खडकांच्या आधारामुळे सुदैवाने होडीतील तिघेही बचावले. सदर दुर्घटनेची माहिती समुद्रात मच्छिमारी करणारे लियाकत मुजावर यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर, सकलेन मुजावर आदींना फोन करुन सांगितल्यावर आचरा पिरावाडी येथील सकलेनमुजावर , आदिल मुजावर,, राजू मुजावर,साहिल मुजावर,मुझफ्फर मुजावर,दिनकर कुबल, बुधाजी पाटील,दर्शन तारी झहिर मुजावर रशिक जोशी हिमांशु पाटील,सचिन सारंग,दिलिप तोडणकर,यांसह अन्य मच्छिमार गाडीने आडबंदर येथे जात खडकात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप आचरा येथे घेऊन आले घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस नाईक परब,जगताप, मनोज पुजारे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस,अनिल करंजे, पाडूरंग वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.