सावंतवाडी रक्तपेढीत अखेर प्रयोगशाळा वैज्ञानिकांची नियुक्ती…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून प्रणाली चिपकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील आदेश होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी काम करायचे आहे, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहेत. त्या यापूर्वी कुडाळ येथे कार्यरत होत्या. या ठिकाणची जागा रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही जागा भरण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी दिली.