केसरकारांकडून फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम…

26
2
Google search engine
Google search engine

एकनाथ नाडकर्णी; आडाळीत अडचण आणण्यासाठी धडपड केल्याचा आरोप…

दोडामार्ग,ता.२२: आडाळीत होणारे महावितरणचे सबस्टेशन हा एमआयडीसीचा अविभाज्य भाग आहे. ज्यावेळी आम्ही एमआयडीसीचा प्रस्ताव दिला तेव्हाच त्याच नियोजन झालेलं होत, असं असताना मंत्री दीपक केसरकरांच्या प्रयत्नाची त्याला गरजच काय…? त्यांच्याकडून आडाळी एमआयडीसीच्या बाबतीत केवळ आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचे काम झालंय. आडाळीच्या प्रकल्पात अडचणी आणण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहॆ. त्यांनी आडाळीत काय नवीन दिवे लावले…? असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केला आहे.
शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी केसरकरांच्या प्रयत्नातून आडाळीत महावितरचे सबस्टेशनं होणारं असल्याचा दावा केला. त्याला श्री. नाडकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘ केसरकर हे सुरवातीपासून आडाळी एमआयडीसीच्या विरोधात होते. त्यावेळी नारायण राणेना विरोध हा एकमेव त्यांचा कार्यक्रम होता. आताही स्वतःच्या हातून काही होत नाही, म्हणून एमआयडीसीच्या प्रकल्पात अडचणी आणण्याचे काम केसरकर करत आहेत. त्यांचे अपयश झाकण्यासाठी गवस दिशाभूल करणारी माहिती जनतेला देत आहे. २०१३ मध्ये एमआयडीसी मंजुरीची कार्यवाही सुरु होती त्याचवेळी पाणी व वीजउपकेंद्राचे नियोजन केले होते. त्यावेळी सर्व्हे करताना अधिकाऱ्यांसोबत आम्ही स्वतः होतो. हे सबस्टेशनं हा कुठल्याही एमआयडीसी क्षेत्राचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे हे सबस्टेशन आडाळीत होणार हे १० वर्षांपूर्वीच निश्चित होत. तसेच त्यावेळीच रस्ते, पाणी, वीज आदी सुविधासाठी निधीची तरतूद निश्चित होती. एखादे औद्योगिक क्षेत्र विकसित होत असताना पायाभूत सुविधा निर्मिण केल्या जातात. त्यासाठी महामंडळला कुणाकडून निधी मागण्याची गरज नसते. किंवा कुठल्या आमदार, मंत्र्यांची गरज नसते. या बाबी प्रशासकीय व महामंडळच्या स्तरावर नियमित कामकामाजाचा भाग म्हणून होत असतात. परंतु ज्यांची क्षमताच नगराध्यक्षपद सांभाळण्याएवढीच मर्यादित आहॆ, त्या केसरकरांना एमआयडीसी बाबत फारशी माहिती असण्याची अपेक्षा ठेवणेच मुळात चूक आहे. एमआयडीसीच्या बाबतीत केसरकर गेल्या दहा वर्षात आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याचेच काम करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना खोटी माहिती देऊन आपण खुप मोठं काम करत असल्याचा त्यांच्यासमोर आव आणत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते त्यांची बाजू मांडण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती देत आहे. आडाळीत भूखंडांचे रेखाकन( प्लॉटिंग ) होऊन पाच वर्षे झाली. त्याचवेळी सबस्टेशन साठी पाच एकरचा भूखंड राखून ठेवला. महामंडळ स्वतः हे सबस्टेशन उभारणार असून त्यांचे टेंडर जानेवारीतच निघाले आहे. मात्र आपण खुपच कार्यतत्पर असल्याचा आव आणणाऱ्या केसरकारांना त्याची माहिती देखील नाही. केसरकारांनी आता विश्रांती घ्यावी. जनतेला आता आपण फारकाही फसवू शकत नाही. लॉंग मार्च च्या इशाऱ्यानंतर केसरकर तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन गेले. तालुक्यातून फक्त त्यांचे पाच सरपंच तिथं गेले, मात्र केसरकरांनी उद्योगमंत्र्याना तालुक्यातून १५ -२० सरपंच आल्याचे सांगितले आहे. एवढा खोटारडेपणा शिक्षणमंत्री असलेल्या केसरकरांना शोभत नाही. जमत नसेल तर काम करु नका. पण खोटारडेपणा तरी थांबवा.