दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी येथील एक ताब्यात…

23
2
Google search engine
Google search engine

एलसीबीची माजगाव येथे कारवाई; दुचाकीसह ८५ हजाराचा मुद्देमा जप्त…

सावंतवाडी,ता.२५: दुचाकीवरुन बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला आज माजगाव येथे ताब्यात घेण्यात आले आहे. संकेत रत्नाकर माळी (वय २५, रा. सालईवाडा-साटेलकर गिरणीच्या बाजूला) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडुन करण्यात आली. यात ६५ हजाराच्या दुचाकीसह २० हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पोलिस हवालदार चंद्रकांत पालकर यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माळी हा माजगाव येथील सोनबहावा प्रकल्पाच्या परिसरात आपल्या दुचाकीवरुन १ मोठे गाठोडे घेवून येताना संशयास्पद दिसून आला. यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या गाठोड्यात दारुच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.