अज्ञात वाहनाच्या धडकेत नेमळे येथे पादचार्‍याचा जागीच मृत्यू…

24
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२७: अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे नेमळे येथील पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नेमळे माणिक चौक परिसरात घडली. नारायण राऊळ (वय ४७) असे संबंधित मृताचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा विनायक राऊळ याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तसेच अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मृत राऊळ हे नेमळे माणिक चौक परिसरातील रस्त्याच्या कडेेला गंभीर अवस्थेत पडलेले तेथील युवक सुयोग राऊळ यांना दिसले. त्यांनी खात्री केली असता ते नारायण राऊळ आहेत, असे त्यांना दिसले. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा विनायक याला फोन करुन वडिलांचा अपघात झाल्याची कल्पना दिली, अशी तक्रार विनायक याने सावंतवाडी पोलिसात दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनधारकाच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अमंलदार महेश अरवारी यांनी दिली.