कणकवली पोलीस ठाण्यात आमदार राणेंसह भाजप कार्यकर्ते आक्रमक

3
2
Google search engine
Google search engine

एका युवतीकडून पाकिस्तान झिंदाबादचा स्टेटस, हिंदू संतांवर टीका

कणकवली, ता.३० : तालुक्‍यातील अल्पसंख्याक समाजातील कनिष्‍ट महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीने सोशल मीडियातील आपल्‍या अकाऊंटवर पाकिस्तान झिंदाबाद तसेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देणारा स्टेटस ठेवला होता. याखेरीज एका हिंदू समाजातील संतांवरही टीका केली होती. हा स्टेटस व्हायरल होताच आज भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. संबधितांवर कारवाईसाठी त्‍यांनी पोलीस स्थानक गाठून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी या प्रकरणाचा सखोल चौकशी करू अशी ग्‍वाही दिली.
तालुक्‍यातील एका खासगी संस्थेतील कनिष्‍ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्‍पसंख्याक युवतीने सोशल मिडियातील आपल्‍या अकाऊंटवर पाकिस्तान समर्थनार्थ संदेश स्टेटस ठेवला होता. पाकिस्तानच्या १४ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनालाही तिने शुभेच्छा दिल्‍या होत्या. त्‍यानंतर एका हिंदू संतांवरही तिने टीका केली होती. याबाबतचे वृत्त समजाताच आमदार नीतेश राणे, जिल्‍हा परिषेदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्यासह आक्रमक झालेल्‍या अनेक कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहा वाजता पोलीस ठाणे गाठले. त्‍यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव हे व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये होते. त्‍यामुळे भाजप कार्यकर्त्यांना पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जाण्यास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी अटकाव केला. त्‍यावेळी भाजप पदाधिकारी आणि त्‍यांच्यात वादंग झाला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस निरीक्षक श्री.यादव यांनी भाजप कार्यकर्त्यांना केबिनमध्ये बोलावून घेतले.
आक्रमक झालेल्‍या भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित अल्पसंख्यांक समाजातील कुटुंबाची चौकशी होऊन त्‍यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच कणकवली शहर आणि परिसरामध्ये जे फळ विक्रेते आहेत आणि ते स्थानिक नसतील तर त्यांचा शोध घेऊन त्यांना इथून बाहेर जाण्यास सांगावे आणि कारवाई करावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल श्री.राणेंसह भाजप कार्यकर्त्यांनी दिला. तर श्री.यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू अशी ग्‍वाही दिली.