अपघाती मृत्यू झालेल्या “धनंजय”च्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या…

24
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांसह धनगर समाजाची मागणी; कुडाळ वीज कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात…

कुडाळ,ता.०४: वीज खांबावर काम करीत असताना शॉक लागून अपघाती मृत्यु झालेल्या महावितरणचा कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी पिंगुळी-गुढीपुर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाजाच्या माध्यमातून आज येथील वीज कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जो पर्यंत संबंधित कुटूंबाला आर्थिक भरपाई दिली जात नाही तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या कुंटूबांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.