सावंतवाडीत उद्या ५१ हजाराची “एकता दहीहंडी”…

29
2
Google search engine
Google search engine

फोडण्याचा मान स्थानिकांना; राजापूरातील महिला गोविंदांची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडी,ता.०६: मुजीब शेख मित्र मंडळ कडून उद्या आयोजित करण्यात येणारी “एकता दहीहंडी” यावर्षी तब्बल ५१ हजाराची असणार आहे. हे बक्षीस शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुरस्कृत केले आहे. विशेष म्हणजे दहीहंडी फोडण्याचा मान स्थानिक पथकांना देण्यात येणार आहे. या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राजापूर येथील महिला गोविंदांचे पथक प्रमुख उपस्थित असणार आहे. याबाबतची माहिती मुजीब शेख मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रवीण गावडे व अण्णा म्हापसेकर यांनी दिली.

दरवर्षी येथील वसंत प्लाझा परिसरात ही दहीहंडी बांधण्यात येते. यावर्षीही दहीहंडी श्री. केसरकर यांनी पुरस्कृत केली आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या गोविंदा पथकांना फक्त थर लावण्याचा मान दिला जाणार असून, थराप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. मात्र हंडी फोडण्याचा मान हा स्थानिक पथकाला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, चलचित्र देखावा आणि सेल्फी पॉईंट चे विशेष आकर्षण असणार आहे. त्यामुळे या दहीहंडीला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्यकर्ते अमोल शितोळे, सदा काजरेकर, मार्टिन अल्मेडा, प्रभाकर गुरव, राजू फर्नांडिस, नारायण तेंडुलकर, दीपेश शिंदे, प्रसाद राऊत, सतीश वरवडेकर व दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.