आरोंदा-सावरजुवा येथे बेकायदा वाळू उपसा करणार्‍यांना “दणका”…

5
2
Google search engine
Google search engine

होडीसह डंपर जप्त; वाळू तस्करांच्या विरोधात सावंतवाडी महसुलची कारवाई…

सावंतवाडी,ता.१६: बेकायदा वाळू उपसा केल्या प्रकरणी सावंतवाडी आरोंदा-सावरजूवा येथे होडीसह वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी महसुल विभागाच्या माध्यमातून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास केली. यात मुद्देमाल व गाडी मिळून अंदाजे १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीच्या महसुल पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यात सावंतवाडी तहसीलदार श्री. पाटील यांच्यासह आंबोली तलाठी सुमित घाडीगावकर व आरोंदा तलाठी प्रविण पोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.