सावंतवाडी पालिकेची कचरा वाहतूक करणारी ई-कार पलटी, सुदैवाने कर्मचारी बचावला…

14
2
Google search engine
Google search engine

विलास जाधव यांची नाराजी; ही  घटना म्हणजे कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार…

सावंतवाडी,ता.१६: येथील पालिकेच्यावतीने कचरा वाहतूक करणारी ईलेक्ट्रीक कार पलटी होवून आज अपघात झाला. यात सुदैवाने चालक बचावला आहे. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या गरड परिसरात घडली. दरम्यान याबाबत पालिकेचे माजी नगसेवक विलास जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गाड्या म्हणजे कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले असून पालिकेने याबाबत तात्काळ गांर्भीयाने भूमिका घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.