काम वेळेत करणे जमत नसेल तर नाथ पै सभागृहात प्लास्टीकच्या खुर्च्या लावा…

12
2
Google search engine
Google search engine

शिक्षणमंत्र्यांनी ठेकेदाराला खडसावले; अडीच वर्षे रेंगाळलेले काम मार्गी लागणार?…

सावंतवाडी,ता.२२: येथील पालिकेच्य नाथ पै सभागृहातील अंतर्गत काम व खुच्या लावण्याचे काम तात्काळ पुर्ण करा, अन्यथा प्लास्टीक खुर्च्या घालून द्या, आम्ही कार्यक्रम सुरू करतो, असे सांगत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज संबंधित काम करणार्‍या ठेकेदाराला खडसावले. यावेळी येत्या दोन दिवसात काम पुर्ण झाले पाहिजे अशा कडक शब्दात त्यांनी सुचना केल्या. यावेळी आपण लवकरात-लवकर काम करू, असे आश्वासन ठेकेदाराने पालिका प्रशासनासह मंत्र्यांना दिले.

सावंतवाडी पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. मात्र या कामाला २ महिन्याचा कालावधी उलटला तरी सभागृहातील खुर्च्याचे काम अर्धवट आहे. तर व्यासपीठाचे काम झालेले नाही. दरम्यान चतुर्थीच्या निमित्ताने पालिकेकडुन घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा या सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर खुद्द शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जावून त्या ठिकाणी सभागृहातील कामाची पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी सर्वच काम अर्धवट असलेले दिसले. यावेळी श्री. केसरकर यांनी ठेकेदारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच हे काम येत्या २ दिवसात पुर्ण करा, अन्यथा खुर्च्या लागत नसतील तर प्लास्टीक खुर्च्या घालून द्या, असे थेट त्यांनी प्रशासनाला सांगितले. यावेळी संबंधित ठेकेदाराने येत्या दिवसात आपण काम पुर्ण करतो, असे सांगून वेळ मारुन नेला. पालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धा या सभागृहात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गेली दोन ते अडीच वर्षे वेळाकाढू भूमिका घेणार्‍या ठेकदाराला मात्र केसरकरांनी अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे संबंधित ठेेकेदार आता काम पुर्ण करतो की नाही हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.