“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”…!!

5
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गात पाच दिवसांच्या गणरायांना भावपुर्ण वातावरणात निरोप…

सावंतवाडी/भुवन नाईक ता.२३: “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!!” च्या जयघोषात सिंधदुर्गात आज ५ दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. सायंकाळपासून गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी दिसत होती. गेले ५ दिवस सिंधुदूर्गात गणेशाचे मोठ्या भक्तीभावाने पुजन करण्यात आले.आज त्या गणरायांना भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.