विशाल परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार, विविध उपक्रमांचे आयोजन…

28
2
Google search engine
Google search engine

दत्ता सामंत; इंदुरीकर महाराज, पॉप सिंगर जुबिनची उपस्थिती, दांडीया व खेळ पैठणीचा कार्यक्रम…

सावंतवाडी,ता.२८: भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, कुडाळ व दोडामार्ग या ठिकाणी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पॉप सिंगर जुबिन नौटियाल यांच्यासह इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपाचे जेष्ठ नेते दत्ता सामंत यांनी दिली. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत.

यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष दादा साईल, बाळु देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, मोहन सावंत, बंड्या सावंत, प्रकाश मोर्ये, रुपेश कानडे, तेजस माने आदी उपस्थित होेते.

या सोहळयाचा शुभारंभ कुडाळ येथे ९ तारखेला माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता इंदुरीकरण महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर ११ तारखेला दोडामार्ग येथे सिने अभिनेता क्रांती मळेगावकर यांच्या उपस्थितीत “न्यू होम मिनीस्टर” खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. १३ ऑक्टोबरला वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडीयम मध्ये भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा समारोप १५ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे होणार आहे. वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पॉप सिंगर “जुबिन नौटियाल” याचा लाईव्ह गाण्याचा शो होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी आणि विशाल परब यांच्या चाहत्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री. सामंत यांनी केले आहे.