कोकण संस्थेच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

4
2
Google search engine
Google search engine

मुंबई,ता.०१: कोकण संस्थेच्या कोस्टल क्लीन अप या उपक्रमांतर्गत दादर किनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणी पर्यटकांनी केलेला कचरा, पीओपीच्या कचऱ्यात रूपांतरित झालेल्या गणरायाच्या मुर्त्या, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादींची विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी सालिना बुटेलो, श्वेता चोरगे, वंश खानविलकर, किशोर नाईक, आयुष आंग्रे, अंकित पराड, अभिजित रेडेकर, सुशील गोळे यांच्याबरोबर लोटस कॉलेजचे अनेक विद्यार्थ्यांनी साफसफाई मोहिमेत भाग घेतला. लोटस कॉलेज ऑफ ऑपटॉमेट्रीच्या प्रिन्सिपल डॉ. प्रेमा चंदे, स्वप्नाली दुभाषी आणि सलोमी कुरणे यांनी सहकार्य केले तर सुनील सैतावडेकर सहाय्यक महापालिका जी उत्तर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला.