पडवेचे ठीक पण शासकीय रुग्णालय अद्ययावत कधी होणार…

8
2
Google search engine
Google search engine

सुशांत नाईक; रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या नितेश राणेंनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी…

कणकवली,ता.०५: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पडवेत आपले रुग्णालय उभारले, पण कणकवलीतील शासकीय रुग्णालय अद्ययावत कधी होणार. तसेच आमदार नितेश राणे यांनी गेल्या ९ वर्षात कणकवली मतदार संघात कोणती विकास कामे केली, या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्याल का? असा सवाल शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज केला. येथील विजय भवन येथे श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, आमदार नितेश राणे रोज उठून पत्रकार परिषद घेतात. आता त्यांनी आम्ही विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे द्यावीत. दररोज एका प्रशनाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. श्री.नाईक म्हणाले, तुम्ही तुमच्या कुटुंबाचे तुमच्या फायद्याचे मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल पूर्ण केले. परंतु कणकवली मतदारसंघातील अविकसीत शासकिय रुग्णालयामधून रुग्णांना चांगली सेवा कधी मिळणार? कुडाळ, मालवण सारखा कणकवली मतदारसंघातील एस्टी बस स्थानकांचा विकास का झाला नाही ? तुम्ही जाहीर केलेल्या १०० कोटींच्या ए.जी.डॉटर्स कचरा प्रक्रीया प्रकल्पाचे काय झाले देशाचे उद्योगमंत्री असलेल्या तुमच्या वडिलांनी कणकवली मतदारसंघातील जनतेसाठी किती उद्योग आणले ? किती लोकांना रोजगार दिला? गेली ९ वर्ष आमदार असूनही देवगड शहराचा पाणी प्रश्न का सुटला नाही? २५ वर्ष तुमचे वडील व तुम्ही सत्तेत असताना तुमच्या गावातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न का सुटू शकला नाही ?

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या गगनबावडा व फोंडा घाट रस्त्यांचा प्रश्न अद्याप का सोडवू शकला नाहीत ? प्रक्षोभक वक्तव्ये करुन हिंदू-मुस्लिम सामाजिक एकोपा बिघडवण्याचे तुमचे प्रयत्न का असतात?. औषध आपल्या दारी, मोफत वायफाय, रिव्हर राफ्टींग, सिंधुदुर्ग गाईड अशा तुम्ही जाहीर केलेल्या योजना आज चालू का नाहीत? आपले वडील मराठा मंडळ कणकवलीचे १७ वर्ष अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रभर आपण स्वतः मराठा समाजाचे नेते म्हणून मिरवता. मग कणकवली मराठा मंडळाचे काम अपूर्ण का? यावेळी मुकेश सावंत, अभय जठार, उमेश मेस्त्री, तेजस राणे, सिद्देश राणे, बंटी उरणकर, संदेश सुतार, सागर गोरुले, मयूर दळवी, नंदू परब आदी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.