नारीशक्ती विधेयकामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा…

19
2
Google search engine
Google search engine

नारायण राणे; सक्षम होण्यासाठी फायदा घ्या,मेळाव्यात आवाहन…

ओरोस,ता.०७: नारीशक्ती वंदन विधेयक आल्यामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. हे विधेयक आल्यामुळे आता महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन महिलांनी सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित भाजपच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते.

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे हा मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नीलम राणे, आमदार नितेश राणे, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, संध्या तेरसे, महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरोज परब, डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.