दारू वाहतूक केल्याप्रकरणी होडावडा येथील एक ताब्यात…

2
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले पोलिसांची कारवाई ; दारूसह २ लाख १५ हजारचा मुद्देमाल जप्त….

वेंगुर्ले,ता.११: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वेंगुर्ला येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दारूसह २ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सायमन बसत्याव घोंसालविस (वय ५५, रा. होडावडा गोसावीवाडी, वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई रात्री शिरोडा मिठागर मार्गावर वेंगुर्ले पोलिसांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरोडा मिठागर येथे भरधाव वेगात जाणारी मारुती सुझुकी अल्टो कारची थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये बेकायदा गोवा बनावटीची सुमारे सुमारे १ लाख ४५ हजारची दारू व कारसह २ लाख १५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि महाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ ) ( ई ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भिसे, योगेश राऊळ, अजित जाधव यांनी सापळा रचून केलेली आहे.