आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गाच्या परिस्थितीला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करा…

23
2
Google search engine
Google search engine

माडखोल ग्रामस्थांची मागणी; ७ तारखेला प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा…

सावंतवाडी,ता.२८: आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गाची तात्काळ डागडुजी करा तसेच या मार्गाच्या परिस्थितीला जबाबदार असणार्‍या ठेकेदार आणि बांधकाम अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान या मार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. त्यामुळे तात्काळ कामाला सुरूवात व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने ७ तारखेला सावंतवाडी येथील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, काही लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी याबद्दल बांधकाम विभागाकडे यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या मात्र संबंधित खात्याने याबाबद कोणतीही दखल घेतली नाही. रस्त्यावर घालण्यात आलेला बी.अम कोट उखडून पडल्या मुळे मोठ्या प्रमाणात वाहने चालवण्यात अडथळे येत आहेत. चतुर्थीच्या कालावधीत तात्पुरती मलपट्टी करू बुझवलेले खड्डे पुन्हा पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.