धनादेशाचा अवमान, वेतोरे येथील एकाला शिक्षा…

14
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.३१: धनादेशाचा अवमान केल्याप्रकरणी वेतोरे येथील एकाला कुडाळ न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. भिकाजी महादेव चिचकर असे संबंधिताचे नाव आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी येथील वरद ॲग्रो इनपुट फार्मचे निनाद शिरसाठ यांनी केली होती. चिचकर याने त्यांना १० लाख रुपयांचा चेक देवून त्यांच्याकडून १० लाख ३० हजाराची किटकनाशके खरेदी केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे परत केले नाहीत. त्यामुळे शिरसाट यांनी कुडाळ न्यायालयात दावा दाखल केला होता.
यात न्यायालयाने आज निकाल दिला. यात २ महिने साधा कारावास व फिर्यादीला १२ लाख रुपये नुकसान भरपाई, २ महिने देण्याची शिक्षा सुनावली आहे. याकामी अँड. राजीव बिले, संजीव प्रभू व अश्विन बोभाटे यांनी काम पाहिले.