कुडाळातील ३ ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा भगवा…

10
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०६: तालुक्यातील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा भगवा फडकला आहे. यात वर्दे सरपंचपदी पप्पू पालव, वालावल- हुमरमळा सरपंचपदी अमृत देसाई, वाडीहुमरमळा-अणाव सरपंचपदी समीर पालव विजयी झाले आहेत. विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली होती. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-खुर्द ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित २३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी संपन्न झाल्या. दरम्यान, सोमवारी तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली.

या निवडणुकीत भाजपने सरपंच पदाच्या २३ पैकी १५ जागांवर विजय मिळविला. यामध्ये कुडाळ तालुक्यात वालावल, भडगांव या ग्रामपंचायतचा समावेश आहे. तर वर्दे, हुमरमळा या ग्रामपंचायतींवर उबाठा गटाने वर्चस्व राखले. तर

वाडीहुमरमळा-अणाव गाव पॅनलने सत्ता काबीज केली. वाडीहुमरमळा-अणाव या ग्रामपंचायतीवर उबाठा गटाने दावा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वालावल ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. येथे सर्वच्या सर्व १० जागांवर भाजपने वर्चस्व निर्माण केले तर सरपंच पदी भाजपचे युवा नेतृत्व राजा प्रभू यांची वर्णी लागली आहे. राजा प्रभू हे ५०० पेक्षा जास्त मताधिक्याने सरपंचपदी विराजमान झाले आहेत.