सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने ८ नोव्हेंबरला “मोटरसायकल रॅली”…

22
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने ८ नोव्हेंबरला मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार श्रीधर पाटील व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी सिताराम गावडे, पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत, अभिषेक सावंत, सोनू दळवी, आनंद धोंड, रामचंद्र मुळीक, उल्हास मुळीक, आकाश मिसाळ, भिवसेन मुळीक आदी उपस्थित होते.