पडवणे येथील एकाची गळफास लावून आत्महत्या…

12
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.१०: पडवणे येथील एकाने घराच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सुनिल जगन्नाथ जाधव(५५) असे त्याचे नाव आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल जाधव हे अविवाहीत असून ते कायम मुंबईला होते. दोन दिवसापुर्वीच मुंबई येथून गावी पडवणे येते आले होते. गावी आल्यानंतर गुरूवारी सायंकाळी जाण्यास निघाले यावेळी त्यांनी त्यांच्या वहिनीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून ते बाहेर पडले. आज सकाळी ९.३० वा.सुमारास दुध विक्री करण्यास जाणाऱ्या महिलेला धारेचे काटे येथील मांगराचा जवळ असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत ते दिसले.तिने या घटनेची माहिती त्यांचा भावाला दिली.त्यानंतर पोलिस पाटील यांना कल्पना दिल्यावर त्यांनी भाऊ व इतर ग्रामस्थ यांच्यासमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली व देवगड पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम, पोलिस हवालदार व्ही.एस्.बिर्जे, पो.कॉ.आचरेकर आदींनी घटनास्थळी जावून गळफास लावलेल्या स्थितीत असलेला मृतदेह काढून पंचनामा केला.या घटनेची खबर पुतणे दिपक गुरूनाथ जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. अधिक तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहे.