सिंधुदुर्गातील “ग्रे हेडेड बुलबुल” पक्षी पोस्ट कार्डवर दिसणार…

14
2
Google search engine
Google search engine

गणेश मर्गजांच्या छायाचित्राची निवड; एस पी. के महाविद्यालयाकडून सन्मान…

सावंतवाडी,ता.११: जिल्ह्यातील जंगलांमध्ये आढळणारा “ग्रे हेडेड बुलबुल” ( राखी डोक्याचा बुलबुल ) या पक्षाची छबी आता पोस्ट कार्डवर प्रकाशित दिसणार आहे. हा पक्षी पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब
खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, सौ. अनुराधा घोरपडे, सौ. प्रिया घोरपडे, बेंगलोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल,
महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रे हेडेड बुलबुल हा पक्षी संकटग्रस्त प्रजातीतील असून हा पक्षी फक्त पश्चिम घाटात सापडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र डोंगर पांग्रड बर्ड हाईड कुडाळ, आचरा, तळकट , तिलारी, मळगाव, बांदा या ठिकाणी सापडतो. हा पक्षी पाहण्यासाठी भारताच्या विविध भागातून पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात.