भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांचा १७ तारखेला सावंतवाडीत सन्मान…

13
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: येथील विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा १७ तारखेला सावंतवाडी येथे कार्यरत होणार आहे. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा प्रमुख राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष श्र्वेता कोरगावकर, डॉ. अमेय देसाई, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब तसेच जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभेतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता तसेच विधानसभेतील विकासकामांच्या चर्चेकरिता सर्व सुपर वॉरियर्स, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख तालुका स्तरीय विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित रहावे, असे आवाहन सुधीर दळवी, सुहास गवंडळकर, रविंद्र मडगांवकर, अजय गोंदावळे, महेश धुरी यांनी केले आहे.