अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत…

14
2
Google search engine
Google search engine

दिपाली भालेकर; केंद्रस्तरीय शालेय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उद्घाटन…

सावंतवाडी,ता.१२: अभ्यासाबरोबर मैदानी खेळही खेळले पाहिजेत, यातूनच देशाचा भावी खेळाडू तयार होऊन भविष्यात देशाचे नाव रोशन करेल, असे प्रतिपादन माजी नगरसेविक दिपाली भालेकर यांनी केली. केंद्रस्तरीय शालेय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक भरत गावडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
यावेळी संतोष तळवणेकर, अजित सावंत, भंडारे, श्री. कित्तूर, कळसुळकरचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रदिप सावंत, श्री. पोवार, सायली लांबर, सौ. सावंत, मीरा मुद्राळे, श्री. धोंडी, वरक, संध्या बिंबवणेकर, प्राची ढवळ, दिप्ती सोनवणे तसेच सर्व शाळांच्या शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी उपस्थित होते.