वैद्यकीय विक्री प्रतिनिधींच्या वतीने एकदिवसीय संप…

11
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.२०: कामगार विरोधी श्रमसंहीता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ हा पूर्नजीवीत करावा यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय विक्री प्रतिनिधी (एमआर) आज एकदिवसीय संप पुकारत आपल्या मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

फेडरेशन ऑॅफ मेडीकल ॲण्ड रिप्रेझेन्टीटीव्हीज असोसिएशन ऑफ इंडीया यांच्या वतीने आज देशभरात संप करण्यात आला. औषधे विक्री संवर्धन कायद्यामुळे वैद्यकीय विक्री प्रतिनिधीच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळाले, स्थैर्यता आली. तोच कायदा केंद्र सरकारने मोडीत काढला आहे. त्यामुळे मालक वर्गाला कर्माचाऱ्यांचे शोषण करण्याचा मार्ग खुला झाला आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधीना औषधी विभागातील पदोन्नतीसाठी केंद्र सरकारेने बंदी घातली आहे. त्यामुळे औषध विक्री प्रतिनिधीच्या रोजगारावर गदा आली. याविषयी दाद मागण्यासाठी हा संप असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सहभागी असल्याचे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टीटीव्हीज असोसिएशन सिंधुदुर्ग युनिट सेक्रेटरी कॉ. सूर्यकांत नाईक यांनी सांगितले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आले. यावेळी युनिट सेक्रेटरी कॉ. सूर्यकांत नाईक, कॉ. मंगेश वरवडेकर, कॉ. जयेश कदम, कॉ. भाऊ चव्हाण, कॉ. महेश पिळणकर आदी उपस्थित होते.