कोचऱ्यात मंजूर ६० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ…

13
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.२६: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोचरेतील क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र श्री दत्त मंदिराच्या ६० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजना क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र अंतर्गत कोचरा श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी सुमारे १० लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत पर्यटन स्थळांच्या मूलभूत सुविधांकरिता अनुदान योजने अंतर्गत कोचरा दत्तमंदिर जेटी परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी सुमारे ३५ लाख रुपये तर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत लहान बंदरांचा विकास करणे यात कोचरा खाडी किनारी दत्तमंदिर जेटी जवळ पर्यटक निवारा शेड बांधणे या साठी सुमारे १५ लाख रुपये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत मंजूर करण्यात आले आहेत.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, कोचरा सरपंच योगेश तेली, निवती सरपंच अवधूत रेगे, सुरज परब, मातोंड ग्रा. प. सदस्य दिपेश परब, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रा.प सदस्य अनिल मेस्त्री, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, स्वरा हळदणकर, प्रगती राऊळ, दत्तमंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष राजेश रेगे, माजी सरपंच सुनील करलकर, माजी उपसरपंच देवदत्त साळगावकर, आबा कोचरेकर, ठेकेदार कौस्तुभ प्रभू व बाळू प्रभू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सरपंच योगेश तेली यांनी शाल, शिफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. तर कोचरे गावासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानत आगामी काळात कोचरा वासीयांनी मंत्री केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आवाहन केले.