खून प्रकरणी सोन्सुरे येथील दोघांची जामीनावर मुक्तता…

47
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२८: आरवली- सोन्सुरे येथील नारायण महादेव कावळे यांचा खुन केल्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून ताब्यात असलेल्या कांचन कृष्णा कावळे व समिक्षा सुहास कावळे या दोघांची जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी ३० हजाराच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. तर अन्य दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. सामायिक घराच्या अंगणात चार चाकी गाडी लावल्याच्या रागातून १७ डिसेंबरला कावळे कुटुंबीयांमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीत नारायण महादेव कावळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात चौघांना वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान २२ डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी संशयितांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येकी ३० हजाराच्या जामीनवर त्यांची मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपींतर्फे ॲड. संग्राम देसाई, ॲड. सागर ठाकूर, ॲड. राहुल पै यांनी काम पाहिले.