जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निरवडेतील दोघांना जामीन…

18
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: निरवडे येथील महिला ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी २५ हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. लक्ष्मण गावडे व श्रीमती गावडे अशी त्या दोघांची नावे आहेत. याकामी ॲड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.

ही घटना २३ तारखेला घडली होती. गावडे दाम्पत्याने कार्यालयात येवून आपल्याला हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच जातीवाचक शिवीगाळ, अशी तक्रार कदम यांनी दिली होती. त्यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आले होते.