कामगाराचे रिक्षातून अपहरण करून रोकडही लंपास…

29
2
Google search engine
Google search engine

रिक्षा चालकासह अन्य एक कणकवली पोलिसांच्या ताब्‍यात…

कणकवली,ता.२८: येथे आलेल्‍या एका कामगाराचे रिक्षामधून अपहरण करण्यात आले. त्‍यानंतर त्‍याच्याकडील रोकडही लंपास करून त्‍याला कुडाळ बसस्थानकात सोडून देण्यात आल्‍याची घटना सोमवार आणि मंगळवार या दरम्‍यान घडली. या प्रकरणी एका रिक्षाचालकासह अन्य एका व्यक्‍तीला पोलिसांनी आज ताब्‍यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ, राजेंद्र गाडेकर, शरद देठे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.

कणकवली पोलीस ठाण्यात धीरेंद्र कुमार श्रीकांत यादव ( रा. उत्तरप्रदेश ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार धिरेंद्र कुमार २५ डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजता मोटरसायकलने कणकवलीत आला होता. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात त्याने रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा बंद मध्ये बसला. त्यानंतर रिक्षाचालक अल्ताफ अत्तर व सहकारी आरोपी सुहास घोगळे यांनी धीरेंद्रकुमार याला मारहाण करून त्याला गोव्याच्या दिशेने घेऊन गेले. गोवा बॉर्डरपर्यंत नेऊन पून्हा दुसऱ्या दिवशी कुडाळात आणले व त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन १८ हजार रुपये एटीएम मधून काढून घेतले, धिरेंद्रकुमार चा २० हजार चा मोबाईल हिसकावून घेत त्याला कुडाळ एसटी बस स्टँड येथे सोडून दिले. त्यानंतर धिरेंद्रकुमार याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. य गुन्ह्यात आरोपी अल्ताफ अत्तर आणि सुहास घोगळे याला कणकवली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पीएसआय राजेंद्र गाडेकर करत आहेत.